कावीळ आजाराला प्रत्येकाने समजून घेण्याची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:11+5:302021-07-25T04:17:11+5:30
२८ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. तापडिया म्हणाले की, ...
२८ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. तापडिया म्हणाले की, कावीळमध्ये हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी हे व्हायरस जास्त महत्त्वपूर्ण असून, टक्केवारीनुसार हिपेटायटिस बीचे प्रमाण २-५ टक्के व हिपेटायटिस सीचे - १-२ टक्के असे आहे. कावीळच्या विषाणूच्या प्रभावाने यकृतावर सूज निर्माण होऊन त्यातील पेशी नष्ट होऊन यकृत कडक होते. रुग्णांच्या लक्षात येईपर्यंत त्यातील अर्ध्याहून अधिक विकृत पेशी नष्ट होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. कावीळची कारणे निरनिराळी असली तरी घरातील कोणालाही या रोगाची बाधा झाली असल्यास, असुरक्षित यौनसंबंध, बाधित व्यक्तीचे रक्त घेतले असल्यास, विषाणूने बाधित सुईने इंजेक्शन दिल्यास, टॅटू अर्थात गोंदण करून घेतल्यावर, दूषित पाणी पिल्यास हा रोग होऊ शकतो. भूक न लागणे, अशक्तपणा, पिवळेपणा, लघवी पिवळी होणे ही या काविळीची प्राथमिक लक्षणे डॉक्टर सांगतात.
कावीळ पाच प्रकारचे
कावीळ पाच प्रकारचे असले तरी यातील महत्त्वाचे बी व सी दोन हिपेटायटिस गंभीर आहेत. हिपेटायटिस बी हा प्रकार फार गंभीर आहे. दोन्ही प्रकारातील लक्षणे काही प्रमाणात सारखी असली तरी हिपेटायटिस सीमध्ये ताप, थकवा, डोकेदुखी, भूक न लागणे, मळमळणे, पोटदुखी, लघवी गडद होणे, मातकट रंगाची विष्ठा आदी लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. सी प्रकारात शंभरपैकी ७५ जणांमध्ये दीर्घकालीन जुनाट संसर्ग विकसित होतो. जुनाट हिपेटायटिस सी असलेले ७५ पैकी २० रुग्ण खूप आजारी पडतात.