‘ईव्हीएम’ने मुस्लिमांच्या मतांचे मूल्य केले शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:17 AM2017-10-23T01:17:09+5:302017-10-23T01:18:38+5:30
अकोला : उमेदवाराला पडलेल्या मतांची बेरीज करता येते,पंरतु त्या मतांची फेरमोजणी करण्याची सुविधा ईव्हीएम मशीनमध्ये नाही, म्हणूनच या इव्हीएम मशीनने देशातील २0 कोटी मुस्लिीमांच्या मताचे मूल्य शून्य केले असल्याचा सनसनाटी आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाच प्रमुख वामन मेश्राम यांनी रविवारी येथे केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उमेदवाराला पडलेल्या मतांची बेरीज करता येते,पंरतु त्या मतांची फेरमोजणी करण्याची सुविधा ईव्हीएम मशीनमध्ये नाही, म्हणूनच या इव्हीएम मशीनने देशातील २0 कोटी मुस्लिीमांच्या मताचे मूल्य शून्य केले असल्याचा सनसनाटी आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाच प्रमुख वामन मेश्राम यांनी रविवारी येथे केला.
आपण कुणाला मत दिले, याची शहानिशा बॅलेट पेपरवर करता येते. मात्र, ईव्हीएमवर तशी सुविधा नाही. त्यामुळेच इलेक्ट्रॉनि क्स मशीनने देशभरातील २0 कोटी मुस्लिमांचे मतं शून्य केली. याची जाणीव मुस्लीम, ओबीसी आणि दलितांना करून देण्यासाठी मी न्यायालयीन व मैदानी लढा उभारला आहे. तथापि त्यानंतरही केवळ मतांची बेरजी (रिटोटल) होते. मतांची फेरमोजणी होत नाही. त्यासाठी देशभरात जनजागृती केली जात आहे. देशात ३१ टक्के मतांवर २८२ पुर्ण असे बहुमत मिळवण्याचा भाजपा ने चमत्कार केला कसा असे सांगताना ते म्हणाले हा तर ईव्हीएम घाटोळा आहे. २0१४ च्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविणार्या भाजपाने २0१९ मध्ये बॅलेट पे परवर निवडणूक घेऊन दाखवावी, असे आवाहनही वामन मेश्राम यांनी केले. संविधान धोक्यात आहे, लोकशाही वाचवायची असेल, तर न्यायालयासह मैदानात उतरून लढा उभारावा लागेल, असेही ते म्हणाले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित पश्चिम विदर्भस्तरीय मेळाव्यास हजारोंच्या संख्येने मुस्लीम समुदाय जमला होता. ऑल इंडिया एकता फोरम आणि राष्ट्रीय मायनॉरिटी मोर्चाच्यावतीने आयोजित या मेळाव्याला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या मेळाव्याचे उद्घाटन नवी दिल्ली येथील ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मौलाना खलिलुल रहेमान सज्जद नोमानी उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून जमियत ए- उलेमा हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अशरद मदनी साहब उपस्थित होते.
मंचावर नाशिक प्रांतचे ख्रिश्चन धर्मगुरू बिशप डॉ. प्रदीप कांबळे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरा त, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी प्रा.बी.एन. हस् ते, संत गाडगे महाराजचे वंशज हरीनारायण जानोरकर, सत्यपाल महाराज, मौलाना सफदार खा कासमी, मुफ्ती मो. अशफाक कासमी, मौलाना कारी अ.करीम नोमानी, मुफ्ती हारून नदमी यांच्यासह अकोल्यातील मस्जीद मदरशाचे पदाधिकारी प्रामु ख्याने उपस्थित होते. एसीसी मैदानात सभा असल्याने टॉवर चौकापासून वजीफदार पेट्रोलपंपापर्यंत गर्दी होती. सर्वसामान्य नागरिकांना भाषणाचा लाभ घेता यावा म्हणूून लाऊडस्पिकर दूर-दूरपर्यंत लावले गेले होते. या सभेमुळे रेल्वेस्थानक आणि परिसरातून जाणार्या वाहतुकीवर परिणाम जाणवत होता.
दिशाभूल करण्याचे कारस्थान : मौलाना खलिलुल
बनावट इतिहासाचा मारा करून सर्वसामान्य नागरिकांची सात त्याने दिशाभूल केली जात आहे. त्यापासून सावध झाले पाहिजे. हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी बकरी-कुत्र्याची एक गोष्ट उदाहरणार्थ सांगून सभेला मार्गदर्शन केले. मूळ निवासी भार तीयांसाठी सेक्यूलर आणि लोकशाही सत्ता आणण्याची जास्त गरज आहे. त्याची ही नांदी समजा, असा इशाराही मौलाना खलिलुल यांनी येथे दिला.
अमन, शांतीसाठी आम्ही सदैव तयार - मौलाना अरशद
देशातील अमन व शांतीसाठी आम्ही सदैव तयार असतो. सरकारसोबत दोनदा बैठकी झाल्यात मात्र त्यातून काही साध्य झाले नाही. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. मात्र, त्याला तडा देण्याचा प्रयत्न होतो आहे. सामान्य नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण न करता रोजगारी हिसकावून घेण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे, अशी टीका येथे मौलाना अरशद यांनी केली.