पोस्ट कोविडच्या १८० रुग्णांची तपासणी; २३ जणांना लंग्स फायब्रोसिस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:50+5:302021-06-16T04:25:50+5:30
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका छातीत दुखणे चक्कर येणे चालताना धाप लागणे हृदयाचे ठोके वाढणे किंवा कमी होणे प्रचंड ...
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
छातीत दुखणे
चक्कर येणे
चालताना धाप लागणे
हृदयाचे ठोके वाढणे किंवा कमी होणे
प्रचंड अशक्तपणा जाणवणे
डोकेदुखी
सर्दी, डोळ्यांची आग होणे
उपचार करणे आव्हानात्मक
कोरोनातील गंभीर लक्षणांवर मात केल्यावर अनेक रुग्णांचे फुफ्फुस किंवा हृदय कमकुवत होते. ऑक्सिजन घेण्याची कार्यक्षमता कमी होते. अशातच रुग्णांला काळ्या बुरशीची लागण झाली असल्यास किंवा रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यास उपचार करणे गुंतागुंतीचे ठरत आहे. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना यातून बाहेर काढणे गुंतागुंतीचे ठरत आहे.
पोस्ट कोविड ओपीडीत तपासणी करा
सर्वोपचार रुग्णालयातील ओपीडी क्रमांक १२० मध्ये पोस्ट कोविड रुग्णांची तपासणी केली जाते. कोरोनावर मात केल्यानंतरही काही त्रास असल्यास रुग्णांनी येथे तपासणीसाठी यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
सर्वोपचारमधील पोस्ट कोविड स्थिती
आतापर्यंत तपासणी - १८० रुग्ण
पुरुष - १०३
महिला - ७७