देगाव येथील शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:25+5:302020-12-15T04:35:25+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीराव म्हैसणे यांनी पुढाकार घेत देगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियापूर्व नेत्र तपासणी ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीराव म्हैसणे यांनी पुढाकार घेत देगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियापूर्व नेत्र तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात परिसरातील जवळपास ३०० रुग्णांची तपासणी केली आहे.
तपासणी शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोळ, डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष तथा महासचिव डॉ. विजय वाघ, गोविंदराव कोगदे, आत्माराम जावरकर, मनोज करणकर, मंगेश म्हैसणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कोगदे, पोलीसपाटील महादेव सरोदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ तराळे उपस्थित होते. यावेळी देगाव व परिसरातील महिला, पुरुष अशा ३०० रुग्णांची नेत्र तपासणी केली. यामध्ये शंभर रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याकामी डॉ. निशिकांत गणोरकर, डॉ. विनय खंडेलवाल, डॉ. सूर्यकांत पेटकर, जी.एम.सी.चे डॉ. मुझफ्फर हुसेन, डॉ. भूषण पेंढारकर, डॉ. आर. ए. सय्यद, डॉ. शे. रहेमान, डॉ. प्रवीण चोपडे यांनी सेवा देऊन नेत्र तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवा ठाकरे, शेख निसार, पुंडलिक कोगदे, पंकज दाळू, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर मानकर, उकर्दा घोंगे, सुनील सरोदे, भगवान सरोदे, पवन म्हैसणे, प्रणव म्हैसणे, श्रीकांत म्हैसणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात शिवाजी म्हैसणे यांनी आभार मानले. (फोटो)