पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेची समितीकडून पाहणी

By admin | Published: August 11, 2016 01:46 AM2016-08-11T01:46:02+5:302016-08-11T01:46:02+5:30

अकोल्यातील स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेला भेट देऊन पाहणी.

Examination by the Committee of Animal, Fisheries and Science | पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेची समितीकडून पाहणी

पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेची समितीकडून पाहणी

Next

अकोला, दि. १0 : नागपूर येथील महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू) आढावा घेतल्यानंतर भारतीय कृषी संशोधन समितीने (आयसीएआर) पाठवलेल्या अधिस्वीकृती समितीने (दिल्ली ) मंगळवारी अकोल्यातील स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेला भेट देऊन पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सेवानवृत्त उप -महाव्यवस्थापक डॉ. व्ही.के. तनेजा यांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची समिती माफसूचा आढावा घेत आहे. माफसू अंतर्गत राज्यात मुंबई, पुण्यासह दहा पशू विज्ञान महाविद्यालये व संशोधन केंद्रे असून, अकोला येथे स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्था आहे. हरियाणातील हिस्सारनंतर पशूवर संशोधन करणारी देशातील ही दुसर्‍या क्रमांकाची संशोधन संस्था मानली जाते. राज्यातील इतर महाविद्यालयांच्या तपासणीनंतर ही अधिस्वीकृती समिती ९ ऑगस्टला सायंकाळी अकोला येथे दाखल झाली. रात्री मुक्काम करू न १0 ऑगस्ट रोजी समितीने येथील स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेला भेट देऊन पाहणी केली. आयसीआर या विद्यापीठाला विविध संशोधन तसेच शिक्षणासाठी निधी उपलब्ध करू न देते, या निधीचा विनियोग कसा होतो, विद्यार्थ्यांंना सोयी, सवलती कशा दिल्या जातात, संशोधनाचा स्तर कसा, माफसूच्या या सर्व बाबींचा सूक्ष्म अभ्यास करू न ही समिती त्यांचा अहवाल आयसीएआरला सादर करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. हेमंत बिराडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. रवींद्र ढोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Examination by the Committee of Animal, Fisheries and Science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.