पिकांचा ‘डीएनए’ तपासून उत्पादन वाढवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:07 AM2020-01-31T11:07:12+5:302020-01-31T11:07:32+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोयाबीन पिकातील अॅन्टी न्यूट्रिशियल घटक (ट्रिपसील) काढून गोडवा आणण्यासाठीचे संशोधन हाती घेतले आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : नवे बियाणे, कृषी संशोधनाला लागणारा दीर्घकाळ कमी करण्यासोबतच वातावरणात अनुकूल पिकांची जात विकसित करू न उत्पादन वाढविण्यासाठी पिकांतील जनुकीय अभियांत्रिकी आधारित ‘डीएनए’ चाचणी केली जात आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोयाबीन पिकातील अॅन्टी न्यूट्रिशियल घटक (ट्रिपसील) काढून गोडवा आणण्यासाठीचे संशोधन हाती घेतले आहे. यामुळे लवकरच खाता येतील अशा गोड सोयाबीनच्या शेंगांचे उत्पादन होणार आहे.
‘डीएनए’जनुकीय चाचणीचा प्रयोग मानवामध्ये केला जात होता. संशोधनानंतर या तंत्रज्ञानाचा वापर हा पिकांमध्ये अधिक उपयोगी असल्याचे समोर आले. या तंत्रज्ञानाच्या आधारे पहिल्या संकरित मका पिकातील प्रथिने ही २.५ मायक्रोग्रॅमवरू न १२ मायक्रोग्रॅमपर्यंत वाढविण्यात कृषी शास्त्रज्ञांना यश आले आहे. बासमती तांदूळ, गहू, मोहरी पिकात या जनुकीय पद्धतीचा वापर करू न गहू उत्पादन वाढविण्यातही यश आले आहे. या पिकांमध्ये जस्त व लोह वाढविण्यात यश येत आहे. आता जैवतंत्रज्ञानाचा हा काळ असून, याच तंत्रज्ञानाच्या आधारे वातावरणाकुल नवीन पिकांच्या जाती विकसित करण्यावर कृषी शास्त्रज्ञांनी भर दिला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे विशिष्ट पिकांचा जनुक ओळखून त्याला दुसऱ्या पिकात स्थानांतरित करण्याचे कमा सध्या सुरू आहे. आपल्याकडे खारपाणपट्टा, दलदल, जमीन आहे. अवर्षण भाग असून, जास्तीचा पाऊस पडल्यास पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाणही बरेच आहे. या वातावरणाला अनुकूल बियाणे, वाण विकसित करू न उत्पादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न या तंत्रज्ञानाद्वारे साधण्यात येत आहेत. कपाशीचे बोंड वाढविण्यातही या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
- सोयबीनचा गोडवा वाढणार!
राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, जवळपास ४० लाख हेक्टरवर शेतकरी पेरणी करतात. तथापि, सध्या उत्पादित सोयाबीन खारवट असून, त्यामध्ये ट्रिपसील घटक असल्याने ते कच्चे खाण्यासाठी योग्य नाही. यातील हेच अॅन्टी न्यूट्रिशियल घटक काढून त्यात गोडवा वाढविण्याचे संशोधन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जैवशास्त्रज्ञ डॉ. एम.पी. मोहरील व डॉ. पी.व्ही. जाधव यांनी हाती घेतले आहे. म्हणजेच सोयाबीन रवंथ व पचवता येईल, असे ते असेल.
‘डीएनए’ जनुकीय बदल करू न भरघोस उत्पादन देणाºया पिकांच्या जातीचा विकास करण्यावर काम सुरू आहे. सध्या सोयाबीनचा गोडवा वाढविण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे.
- डॉ. एम.पी. मोहरील,
जैवशास्त्रज्ञ,
जैवतंत्रज्ञान विभाग,
डॉ. पंदेकृवि, अकोला.