परीक्षांचा खेळ, सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 10:22 AM2021-08-11T10:22:51+5:302021-08-11T10:22:58+5:30
Education Sector News : विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.
अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे शिक्षणक्षेत्रात माेठी उलथापालथ झाली असून, परीक्षांचा खेळ झाला आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी - सीईटी परीक्षेपासून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली आणि इयत्ता बारावीचा निकाल ४ ऑगस्टला जाहीर झाला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी काेराेनामुळे इयत्ता १२वीचे निकाल रखडले हाेते. इयत्ता १२वीचे निकाल लागण्यापूर्वीच सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली. त्यानंतर इयत्ता १२वीचा निकाल ४ ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात आला. यावर्षी १२वी उत्तीर्ण झालेले हजाराे विद्यार्थी या परीेक्षेसाठी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी हाेत आहे.
अर्ज करण्यासाठी हवी मुदतवाढ
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली हाेती. त्यामुळे, यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील हजाराे विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे, अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. त्यामुळे, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सीईटीसाठी इच्छा असूनही अर्ज करता आला नाही. मुदत आधी हाेती व १२वीचा निकाल नंतर लागला, यात आमची काय चूक आहे. मुदत वाढली तर अर्ज करता येईल.
जयेश सरदार, विद्यार्थी
सीईटी परीक्षा महत्त्वाची आहे. त्याची तयारीही केली आहे. मात्र, मुदत संपल्याने अर्ज करता आला नाही. आता अर्ज करण्याची संधी मिळाली तर उत्तम हाेईल.
उन्मेष देशमुख, विद्यार्थी