अकोला येथील सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेचा शानदार समारोप
By admin | Published: October 12, 2014 11:11 PM2014-10-12T23:11:14+5:302014-10-12T23:14:37+5:30
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूचा गौरव.
अकोला : मागील दोन दिवसापासून प्रभात डे बोर्डिंग स्कूल येथे सुरू असलेल्या सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेचा शानदार समारोप रविवारी झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मराठी साहित्यिक मिलिंद जोशी, टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सीबीएसईचे निरीक्षक डॉ. इंद्रजित बासू व प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रभात ग्रुपचे सचिव निरज आवंढेकर, गणेश मंगरुळकर, प्राचार्य कांचन पटोकार, उ पप्राचार्य वृषाली वाघमारे, प्रा. प्रदीप अवचार व नर्गिस काझी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेळाडू, प्रशिक्षक, पंच व स्पर्धेसाठी परिश्रम घेणार्यांचा सन्मान करण्यात आला. अकोल्यातील पहिले राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू डॉ. शुक्ला यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना मिलिंद जोशी यांनी आज आम्ही खेळाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त केली. खेळांमधून संघ भावना, सर्मपण, एकाग्रता हे गुण शिकण्यास मिळतात. आज समाजा तील खिलाडूवृत्ती कमी होत चालली आहे. सकारात्मक भावना निर्माण करणार्या खेळाला विद्या र्थ्यांनी अंगीकारण्याचे आवाहन जोशी यांनी केले. इतर मान्यवरांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नर्गिस काझी यांनी केले. यावेळी खेळाडू, शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.