राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन
By admin | Published: September 20, 2016 01:31 AM2016-09-20T01:31:42+5:302016-09-20T01:31:42+5:30
अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन.
अकोला, दि. १९- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सन २0१६-१७ चे आयोजन १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अकोल्यातील महेश भवन येथे केले आहे. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील १४, १७, १९ वर्षाआतील २४0 खेळाडू (मुले व मुली) सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उज्ज्वला देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोपीकिसन बाजोरिया, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, जिल्हा ग्रंथपाल सोपान सातभाई,अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, कॅरम महासंघाचे उपाध्यक्ष प्रभजित बछेर, महानगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संदीप पुंडकर, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव राजेंद्र जळमकर, बुद्धिबळ संघटनेचे सचिव जितेंद्र अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात शेखर पाटील यांनी, स्पर्धेत २४0 मुले व मुली खेळाडूंसह ४८ संघ व्यवस्थापक सहभागी झाले. विजेते स्पर्धेत तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात होणार्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गणेश कुळकर्णी यांनी केले. आभार लक्ष्मीशंकर यादव यांनी मानले.
राही रघुवंशीने दिली खेळाडूंना शपथ
अमरावती विभागाची राष्ट्रीय बुद्धिबळपटू राही रघुवंशी हिने स्पर्धेत सहभागी खेळाडूंना स्पर्धेतील नियमांचे पालन करण्याबद्दलची शपथ दिली.
अध्यक्ष विरुद्ध महापौर
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे आणि महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यात लढत लावून करण्यात आले.
'शतरंज के खिलाडी'
आमदार गोपीकिसन बाजोरिया आणि मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यातही लढत झाली. राजकारण आणि प्रशासनात बुद्धीचे बळ लावणारे हे दोघेही 'शतरंज के खिलाडी' या स्पर्धेनिमित्त आमने-सामने आले होते.