तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी निघाली अंत्ययात्रा

By admin | Published: October 13, 2016 02:12 AM2016-10-13T02:12:58+5:302016-10-13T02:12:58+5:30

पत्नीच्या तेरवीला पतीचे निधन झाल्याचर घटना खामगाव येथे बुधवारी घडली.

Excerpts from Thirvi's program | तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी निघाली अंत्ययात्रा

तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी निघाली अंत्ययात्रा

Next

खामगाव, दि. १२- पत्नीच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने पत्नीच्या तेरवीच्या दिवशीच पतीचेही निधन झाले. ही घटना खामगावात बुधवारी घडली. पती-पत्नीची सात जन्माची गाठ या घटनेमुळे कायम राहिली, असा सूर नातेवाइकांमधून निघाला.
स्थानिक चांदमारी भागात रहिवाशी असलेले वसंतराव यशवंतराव आखरे यांच्या पत्नी सिंधूबाई वसंतराव आखरे वय ६९ यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. त्यानिमित्ताने सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु सकाळी ६ वाजताच्या सुमारास वसंतराव आखरे वय ८२ यांची प्रकृती बिघडली व यामध्ये त्यांचे निधन झाले. वसंतराव आखरे यांच्या निधनाने त्यांच्या नातेवाइकांना धक्काच बसला. आईच्या तेरवीच्या दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहे. मृत वसंतराव आखरे व सिंधूबाई आखरे दोघेही पदवीधर होते. वसंतराव आखरे यांनी कबड्डी खेळात १९५९ ला विद्यापीठ स्तरावर कलरकोट मिळविला होता, तर सिंधूबाई यांनी बॅडमिंटन स्पर्धेत १९६५ ला कलरकोट मिळविला होता. वसंतराव आखरे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता.
त्यामुळे निधनानंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Excerpts from Thirvi's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.