गरजेपेक्षा जास्त पाणीही आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:33+5:302021-09-23T04:21:33+5:30

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होते; तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला अपायकारक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा ...

Excess water is also harmful to health | गरजेपेक्षा जास्त पाणीही आरोग्याला अपायकारक

गरजेपेक्षा जास्त पाणीही आरोग्याला अपायकारक

Next

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होते; तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला अपायकारक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाणी प्राशन करावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

कोणी किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

० ते ६ महिने : आवश्यकता नाही

६ महिने ते १ वर्षे : २५० मिलिलिटर

१ ते ३ वर्ष : १ लिटर

४ ते ८ वर्षे : १.२ लिटर

९ ते १३ वर्षे : १.८ लिटर

१४ ते १८ वर्षे : ३ लिटर

१८ वर्षावरील : ४ लिटर

शररीराला पाणी कमी पडले तर ...

शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले तर डोके दुखणे, चक्कर येणे, डी-हायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशन होऊन मूत्रपिंडावर परिणाम होतो.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

शरीराला गरज भासते तेव्हा मेंदू तहान लागल्याचा संदेश पाठवतो. नॉर्मल मनुष्य चार लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतो. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढू शकते. किडणी, हृदयविकार व सोडियमची कमतरता असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण निश्चित करावे.

- डॉ. आनंद शर्मा, युरॉलॉजिस्ट, अकोला

निरोगी शरीरासाठी दिवसातून ३ ते ४ लिटरदरम्यान पाणी पुरेसे आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी प्राशन केले तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Excess water is also harmful to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.