मूर्तिजापूर तालुक्यासह ९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:09+5:302021-09-08T04:24:09+5:30
९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद ! जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८१.९ मिलिमीटर पाऊस झाला असून, अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. ...
९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद !
जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८१.९ मिलिमीटर पाऊस झाला असून, अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
...........................................................
महसूल मंडळनिहाय अशी झाली अतिवृष्टी!
मंडळ पाऊस (मिमी)
निंबा ७५
माना ९०.८
शेलू १२०
लाखपुरी ७६
कुरूम ९८
जामठी ९२
राजंदा ८०
व्याळा ७६
बाळापूर ७१
..........................................................
शेतांत पाणी; पिके बुडाली!
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतात पाणी साचले असून, पिके पाण्यात बुडाली आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर पुन्हा अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात पिके बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
.............................................