मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:20 AM2021-07-28T04:20:11+5:302021-07-28T04:20:11+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले. नदीकाठच्या शेती व ...
मूर्तिजापूर : तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले. नदीकाठच्या शेती व गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तसेच शेतामध्ये पाणी साचून शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. कोरोना प्रादुर्भामुळे सामान्य नागरिक संकटात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली; मात्र ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा तत्काळ सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता, तालुका अध्यक्ष तेजस टापरे, उज्ज्वल ठाकरे, अनिरुद्ध बांबल, सागर नवले, वैभव वानखडे, पवन तळोकार, विजय नवले, प्रवीण नवले, आकाश सावळे, रोशन किर्दक, रवी गोयकर, राजेश खंडारे, अनुराग बाहे आदी उपस्थित होते.