पहिले आनंदी आभासी मराठी बालकुमार नाट्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:15 AM2021-06-02T04:15:52+5:302021-06-02T04:15:52+5:30

अकोला : आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र,अकोला यांच्या वतीने आयोजित पहिले आनंदी आभासी मराठी बालकुमार ...

In the excitement of the first Anandi Virtual Marathi Balkumar Natya Sammelan | पहिले आनंदी आभासी मराठी बालकुमार नाट्य संमेलन उत्साहात

पहिले आनंदी आभासी मराठी बालकुमार नाट्य संमेलन उत्साहात

Next

अकोला : आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र,अकोला यांच्या वतीने आयोजित पहिले आनंदी आभासी मराठी बालकुमार नाट्य संमेलन साेमवारी वेगवेगळ्या कार्यक्रमांनी चित्रपट जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरे झाले.

सकाळी दहा वाजता या संमेलनाची सुरुवात रांगोळीकार सुनील काटकर,मेहकर यांच्या सुरेख रांगोळीने,नंतर मुंबई येथून नृत्यांगणा ऐश्वर्या साखरे यांनी भरतनाट्यम नृत्य तर कोल्हापूर येथून गायिका भक्ती माळी,कोरे यांनी स्वागतगीत गाऊन या संमेलनास कलेची देवता नटराज यांचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.या बालकुमार नाट्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे यांच्या शुभ हस्ते झाले. यानंतर स्वागताध्यक्ष प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.संमेलनाला उपस्थित उद्घाटक मेघराज राजेभोसले,प्रख्यात अभिनेते जयवंत वाडकर,मुंबई,संमेलनाध्यक्ष बालकलाकार श्रीनिवास पोकळे,अमरावती,प्रख्यात दिग्दर्शिका,अभिनेत्री,निर्मात्या कांचन अधिकारी,मुंबई,सेन्साॅर बोर्डाच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले,पुणे,'दख्खनचा राजा ज्योतिबा'मालिका फेम बालकलाकार रेहान नदाफ या सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात राज्य पुरस्कार प्राप्त नाट्यलेखक प्रशांत दळवी,कोल्हापूर यांची प्रकट मुलाखत अनिरुद्ध जळगावकर व समृद्धी खडसे यांनी घेतली. नंतर ज्येष्ठ नाटककार लक्ष्मण द्रविड,कोल्हापूर यांचे 'रंगभूमीवरील नाटकाची पूर्वतयारी',अभिनेते दिनेश काळे,नागपूर यांचे मराठी बालचित्रपट,नृत्यांगणा ऐश्वर्या साखरे,मुंबई यांचे बालकुमारांच्या विश्वातील नृत्य या विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली. त्यानंतर बालगायक वीर केळकर यांनी नाट्यगीत गायन केले.आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी,अकोलाच्या अनुप फाले,समृध्दी खडसे,अनिरुध्द जळगावकर,रावेर,इशा कानडे,उस्मानाबाद,श्रेस्ती नळकांडे,दर्यापूर,संस्कृती शेटे,यवतमाळ,अनिकेत गौरकार,पवनपुत्र चव्हाण,समृद्धी टापरे,संस्कृती साकरकार,स्वयम साकरकार,शिवण्या शेटे,समर्थ फाले,स्वराज सोसे,समृद्धी झंझाळ,सार्थक झंझाळ,सानवी लंगोटे,सार्थक लंगोटे,आरंभी तंबाखे या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी अभिनय व नृत्य सादर केले.

Web Title: In the excitement of the first Anandi Virtual Marathi Balkumar Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.