महिनाभरात ११५ कोटी खर्च करण्याची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:52+5:302021-03-04T04:32:52+5:30
अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांततर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजूर १६५ कोटी रुपयांच्या निधीपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ ५० कोटींचा ...
अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांततर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजूर १६५ कोटी रुपयांच्या निधीपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ ५० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.त्यामुळे मार्च अखेरपर्यंत महिनाभराच्या कालावधीत उर्वरित ११५ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी यंत्रणांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध योजना आणि विकासकांसाठी १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.मंजूर निधीपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत यंत्रणांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन विभागामार्फत विकासकामांसाठी ७० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. वितरित निधीपैकी ५० कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला असून, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उर्वरित ११५ कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. ''मार्च एन्ड''ला केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे.त्यामुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विकासकामांचा अखर्चित ११५ कोटींचा निधी महिनाभरात खर्च करण्यासाठी यंत्रणांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने अखर्चित असलेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च होणार की नाही आणि उपलब्ध निधीतून विकासकामे मार्गी लागणार की नाही, याबाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंजूर निधी आणि खर्चाचे
असे आहे वास्तव!
*जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी
१६५ कोटी रुपये.
*विकासकामांसाठी यंत्रणांना वितरित निधी
७० कोटी रुपये.
*वितरित निधीपैकी झालेला खर्च
५० कोटी रुपये.
*फेब्रुवारी अखेरपर्यंत अखर्चित निधी
११५ कोटी रुपये.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकासकामांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करून, मंजूर निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
-गिरीश शास्त्री
जिल्हा नियोजन अधिकारी