मक्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढ अपेक्षित
By Admin | Published: October 14, 2014 01:29 AM2014-10-14T01:29:13+5:302014-10-14T01:29:13+5:30
खरीप मक्याला क्विं टलमागे १२00 रुपये दर मिळण्याची शक्यता
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी खरीप मक्याच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत १.५ टक्का म्हणजे सुमारे ११३ लाख टन मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरिपातील या मक्याला राज्यात ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशातील एकूण मका उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ९ टक्के आहे.
तृणधान्य प्रकारात मोडणार्या मका या पिकाच्या उत्पादनात जगभर गत पाच वर्षांंमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील एकूण मका उत्पादनापैकी सर्वाधिक २१ टक्के उत्पादन आंध्र प्रदेशात होते. त्यापाठोपाठ १६ टक्के कर्नाटक, १0 टक्के राजस्थान, ९ टक्के महाराष्ट्र आणि प्रत्येकी ६ टक्के उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मका उत्पादन होते. जगभर यावर्षी मक्याच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी यावर्षी अनियमित पावसामुळे भारतातून निर्यात होणार्या मक्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग आणि कृषी विपणन केंद्राने धुळे येथील बाजारपेठेतील मागील २४ वर्षांच्या मासिक दराचे पृथ्थकरण करून काढलेल्या निकर्षानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मक्याचे दर ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.