गॅस सिलिंडर महागल्याने, ग्रामीण भागात पेटल्या चुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:11+5:302021-03-09T04:21:11+5:30

निहिदा: केंद्र व राज्य सरकारने घरगुती सिलिंडरचे दर वाढविल्यामुळे पिंजर भागातील मजुरी करणाऱ्या अनेक महिलांनी घरगुती सिलिंडर ...

Expensive gas cylinders, stoves burning in rural areas! | गॅस सिलिंडर महागल्याने, ग्रामीण भागात पेटल्या चुली!

गॅस सिलिंडर महागल्याने, ग्रामीण भागात पेटल्या चुली!

Next

निहिदा: केंद्र व राज्य सरकारने घरगुती सिलिंडरचे दर वाढविल्यामुळे पिंजर भागातील मजुरी करणाऱ्या अनेक महिलांनी घरगुती सिलिंडर वापरण्याकडे पाठ फिरविली आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडले आहे. महागाईमुळे सिलिंडर वापरणे कठीण होत असल्याने बऱ्याच महिलांनी घरच्या चुली पेटविल्या आहेत.

केंद्र सरकारने यापूर्वी गोरगरिबांना केवळ शंभर रुपयांत सिलिंडर दिले होते. त्यामुळे गरीब नागरिकसुद्धा गॅस सिलिंडरचा वापर करीत होते. परंतु, आता घरगुती गॅस सिलिंडरचे भाव हजार रुपयांच्या घरात गेल्याने गरिबांना सिलिंडर वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे गोरगरीब मजुरांनी जंगलातून लाकूडफाटा जमा करून चूल पेटविली आहे. चार- पाच महिन्यांपूर्वी सिलिंडरचे भाव ५१६ रुपये होते. नंतर ७९४ रुपये झाले. फेब्रुवारी महिन्यात ८१९ रुपये तर आजघडीला ८४४ रुपयांना सिलिंडर विकत घ्यावे लागते. हजार रुपयांच्या घरात सिलिंडर गेल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दोनशे रुपयाने मजुरी करावी की, महागाईशी सामना करावा, असा प्रश्न महिलांना पडला आहे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भावसुद्धा वाढले आहेत. लॉकडाऊनचा फायदा घेऊन किराणा विक्रेता जीवनावश्यक वस्तूंची जादा भावाने विक्री करीत आहेत.

फोटाे:

गॅस सिलिंडरचे दर वाढविल्यामुळे आता गॅस सिलिंडर परवडत नाही. केंद्र शासनाने स्वस्त व सबसिडीवर गॅस सिलिंडर दिले. अचानक भाव वाढविल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना चुली पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. -शोभना गावंडे, गृहिणी

केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना सुरू करून आमची दिशाभूल केली. हजार रुपयांचे सिलिंडर परवडत नसल्यामुळे आम्ही पुन्हा चुली पेटविल्या आहेत.

-रुपाली चिल्होरकर, गृहिणी पिंजर

गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे ग्रामीण भागातील १५ टक्के नागरिकांनी गॅस सिलिंडर घेणेच बंद केले आहे. ग्रामीण भागातील गृहिणींना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. -पवनकुमार जयस्वाल, व्यवस्थापक इंडेन गॅस एजन्सी पिंजर

Web Title: Expensive gas cylinders, stoves burning in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.