रेल्वे आरक्षणातील तिकिटांचा काळाबाजार उघड

By Admin | Published: March 18, 2015 01:51 AM2015-03-18T01:51:04+5:302015-03-18T01:51:04+5:30

तत्काळ रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणारा युवक अटक; मलकापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाची कारवाई.

Explain the Railway Reservation Tickets on the Railway Reservation Tickets | रेल्वे आरक्षणातील तिकिटांचा काळाबाजार उघड

रेल्वे आरक्षणातील तिकिटांचा काळाबाजार उघड

googlenewsNext

मलकापूर (जि. बुलडाणा) : तत्काळ रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणार्‍या ३१ वर्षीय युवकास मलकापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने १७ मार्च रोजी रंगेहात पकडल्याची घटना घडली. बुलडाण्यात अटक करण्यात आलेल्या सदर युवकाकडून २४00 रुपयांची त त्काळची तिकिटेही जप्त करण्यात आली. या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाच्या मलकापूर कार्यालयाने दिलेली माहिती अशी की, बुलडाण्यात रेल्वेची तत्काळ तिकिटाची सुविधा असताना तिकिटे सहज मिळत नाही. त्याचा काळाबाजार होतो, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक प्रफुल्ल गवई यांच्या मार्गदर्शनात आरक्षक रंजन तेलंग व आरक्षक गजानन जाधव आदींच्या पथकाने बुलडाण्यात पीआरएस येथे धाड टाकली व आनंद सुभाष जाधव (वय ३१) रा. सुवर्ण नगर बुलडाणा याला २४00 रुपयांच्या दोन ितकिटासह अटक केली. तिकिटासाठी सदर युवक प्रती तिकीट २00 रुपये शिवाय घेतो, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी चीफ रिझर्वेशन सुपरवायझर व्यंकटरायण सुरी यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याच रेसुब सूत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे बुलडाण्यात आणखी काही जण अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Explain the Railway Reservation Tickets on the Railway Reservation Tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.