युवकाकडून अल्पवयीन मुलीचे शोषण; मुलीला गर्भधारणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:22 PM2019-03-23T18:22:22+5:302019-03-23T18:22:35+5:30
अकोला: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. यातून मुलीला गर्भधारणा झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला.
अकोला: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. यातून मुलीला गर्भधारणा झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. रामदासपेठ पोलिसांनी आरोपी युवकाला गजाआड करून त्याची २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पूर्वी हनुमान बस्ती भागात राहायची. तिच्या घराजवळ राहणारा आरोपी शुभम रमेश डहाके (२४ रा. हनुमान बस्ती) याच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून शुभमने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला घराजवळीलच एका खोली बोलावून तिच्यासोबत लगट करायचा. मुलीने त्याला विरोध केला; परंतु त्याने बळजबरीने तिचे लैंगिक शोषण केले. यानंतरही त्याने सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी तिने पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने तिला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्यावर आईला धक्काच बसला. आईने विचारणा केल्यावर मुलीने शुभम डहाके याने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची आपबिती कथन केली. बालकल्याण समितीने मुलीचा जबाब नोंदविल्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी शुभम रमेश डहाके याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(आय)(एन), पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)