पोपटखेड धरणातून अवैध रेती उत्खनन
By admin | Published: April 7, 2017 12:54 AM2017-04-07T00:54:02+5:302017-04-07T00:54:02+5:30
पोपटखेड : येथील धरणामधून जेसीबी मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करण्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पोपटखेड : येथील धरणामधून जेसीबी मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करण्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पोपटखेड धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जेसीबीच्या माध्यमातून हे उत्खनन होत असल्याने नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. कुठलीही परवानगी न घेता हे उत्खनन होत असल्याचे चित्र आहे. पोपटखेड गावात अनेकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. ग्रामस्थांनी रेती आणण्याचा प्रयत्न केला असता महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. मात्र,जेसीबीने उत्खनन होत असूनही त्यावर महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. याविषयी तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्याची संपर्क केला असता उत्खननाची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले.
धरण व नदी पात्रातील उत्खनन बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. हे उत्खनन तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.