फरार दहशतवाद्यांचा अकोल्यात शोध
By admin | Published: September 15, 2014 02:05 AM2014-09-15T02:05:11+5:302014-09-15T02:05:11+5:30
बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा संशय; वर्षभरापूर्वी खंडवा येथून केले होते पलायन
अकोला - खंडवा कारागृहातून वर्षभरापूर्वी फरार झालेल्या दहशतवाद्यांचा उत्तरप्रदेशात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबध असून या पृष्ठभूमीवर रविवारी अकोल्यात शोध मोहिम राबविण्यात आली. हे दशहतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेशी संबंधित आहेत. वर्षभरापूर्वी खंडवा कारागृहातून फरार झाल्यानंतरही त्यांच्या शोधासाठी अशाच प्रकारे शोध मोहिम राबविण्यात आली होती.
अलिकडे देशात घडलेल्या काही बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये संशयाची सूई सिमीच्या पाच दहशतवाद्यांकडे जाते. मध्य प्रदेशातील पोलिस कर्मचारी सीताराम यादव यांची ह त्या केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पाचही दहशतवादी सिमी संघटनेचे सदस्य आहेत. हे आरोपी मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून १ ऑक्टोबर २0१३ रोजी फरार झाले होते. शुक्रवारी उत्तरप्रदेशातील ब्रिजनोर जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात या दशहतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. वर्षभरापूर्वी हे आरोपी फरार झाल्यानंतर अकोल्याकडे आले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आत पुन्हा हे दशतवादी अकोल्याकडे तर आले नाहीत ना, या संशयावरून अकोला रेल्वे स्थानक परिसरात रविवारी शोध मोहिम राबविण्यात आली. या दहशतवाद्यांमध्ये महेबूब, जाकीर व अस्लम यांच्यासह आणखी दोघांचा समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.