साेनसाखळी पळविणाऱ्या आंतरराज्यीय टाेळीचा पर्दाफाश
By सचिन राऊत | Published: January 27, 2024 09:54 PM2024-01-27T21:54:29+5:302024-01-27T21:54:37+5:30
कारागृहातून करायचे चेन स्नेचींगचे नियाेजन, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची माहिती
अकोला : मध्यप्रदेश व महाराष्ट्रात साेनसाखळी पळविणाऱ्या चाेरटयांच्या टाेळीला बेडया ठाेकण्यात स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला शनिवारी यश आले. या टाेळीतील सदस्यांना मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अटक केल्याची माहीती पाेलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शनिवारी रात्री आयाेजीत पत्रकार परिषदेत दिली. हे चाेरटे कारागृहात बसून 'चैन स्नॅचींग'चे नियाेजन करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कारवाईत दोन दुचाकीसह एकूण ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या टाेळीतील चाेरटयांनी अकाेला शहरात दाेन दुचाकी चाेरल्या. त्यानंतर या दुचाकींवर काैलखेड व सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तोष्णीवाल लेआउट येथील महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी पळवीली हाेती. या दाेन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करून तपास सुरु करण्यात आला. स्थानीक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांमध्ये मध्यप्रदेश इंदौर येथील कुविख्यात 'चैन स्नॅचर' सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने मध्यप्रदेश गाठत चैन स्नॅचर' आरोपी संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, यास ताब्यात घेतले. त्यानंतर अभीषेक अनंतीलाल साहु रा. विलास नगर, अमरावती, शंकर उर्फ वसीम फुलचंद भदोरीया रा. बर्हानपुर मध्यप्रदेश, दिपक शंकरराव पानझाडे रा. डाबकी रोड यांनाही ताब्यात घेतले. या आरोपींनी पोलिस स्टेशन सिव्हील लाईन, खदान, सिटी कोतवाली व रामदास पेठ हद्दीत पाच गुन्हे केल्याचे समाेर आले. तसेच जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर, भुसावळ येथेही गुन्हे केल्याची कबूली या टाेळीने दिली.