कापूस खरेदीसाठी नोंदणीला मुदतवाढ द्या - आमदार नितीन देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:43 PM2020-04-22T17:43:35+5:302020-04-22T17:43:41+5:30
नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले.
अकोला : ‘सीसीआय’कडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कापूस खरेदीसाठी नोंदणीची मुदत मंगळवारी संपल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यांची समस्या दूर करण्यासाठी नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ असल्याने सर्व प्रकारची कापूस खरेदी सध्या बंद आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कापूस खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्याच्या पणन संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणित कार्यपद्धतीने बाजार समित्यांमध्ये परवानाधारक खासगी व्यापाºयांकडून कापूस खरेदीला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील सहा समित्यांमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकºयांना १८ ते २१ एप्रिल दरम्यान नोंदणीची संधी देण्यात आली. त्यासाठी बाजार समिती व्यवस्थापनाने एकाच कर्मचाºयाचे संपर्क क्रमांक दिले. तसेच प्रत्यक्ष समिती परिसरातही नोंदणीसाठी कक्ष उघडला; मात्र या कालावधीत अनेक शेतकºयांना नोंदणी करता आली नाही. तसेच एकच क्रमांक असल्याने अनेकदा तो लागत नव्हता, व्यस्त येत होता. काही वेळा नो रिप्लायही झाला. त्यामुळे शेतकºयांना नोंदणीमध्ये अडथळा निर्माण झाला. या सर्व समस्या पाहता कापूस विक्रीसाठी शेतकºयांना नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत करावी, तसेच बाजार समित्यांनी आणखी संपर्क क्रमांक उपलब्ध करावे, या सुविधा देण्याची मागणीही आमदार देशमुख यांनी पत्रातून केल्याचे उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले आहे.