उच्च शिक्षण संचालनालय नियंत्रणातील १७३४ अस्थायी पदांना मुदतवाढ

By admin | Published: March 24, 2015 12:33 AM2015-03-24T00:33:51+5:302015-03-24T00:33:51+5:30

अमरावती विभागातील २४८ पदांचा समावेश.

Extension of 1734 temporary posts in Directorate of Higher Education | उच्च शिक्षण संचालनालय नियंत्रणातील १७३४ अस्थायी पदांना मुदतवाढ

उच्च शिक्षण संचालनालय नियंत्रणातील १७३४ अस्थायी पदांना मुदतवाढ

Next

खामगाव (जि. बुलडाणा) : उच्च शिक्षण संचालनालय, पुणे त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालये, महाविद्यालये, संस्था यामधील कार्यरत असलेल्या १७३४ पदांना २८ फेब्रुवारी २0१६ पर्यंंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थामधील कारभार यापुढेही एक वर्ष अस्थायी कर्मचार्‍यांवर चालणार आहे. याबाबतचा मंजुरी आदेश शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २0 मार्च रोजी दिला आहे. उच्च शिक्षण संचालनालय यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कार्यालय, महाविद्यालय, संस्थांमधील अस्थायीपदांची मुदत २८ फेब्रुवारी २0१५ रोजी संपली होती. त्यामुळे शासनाने अशा अस्थायी असलेल्या उच्च शिक्षण संचालयालयाच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातील एकूण १६४0 पूर्णवेळ व ९४ अर्धवेळ पदांना १ मार्च २0१५ ते २८ फेब्रुवारी २0१६ पर्यंंंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये उच्च शिक्षण संचालनालय पुणे येथील ७७ तसेच सहसंचालक उच्च शिक्षण विभाग पुणे अंतर्गत ४६, मुंबई विभाग ४९८ पूर्णवेळ व ५७ अर्धवेळ, नागपूर विभाग २३२ पूर्णवेळ व ५ अर्धवेळ, औरंगाबाद विभागातील २४0 व ८, अमरावती विभागातील २४१ व ७, कोल्हापूर विभागातील १0५ व ९, जळगाव विभागातील ३७, नांदेड विभागातील ७२ व ४, कोकण विभागातील ६३ व ४ तसेच सोलापूर विभागातील २९ अशा १६४0 पूर्णवेळ व ९४ अर्धवेळ एकूण १७३४ पदांना १ वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. *अमरावती विभागातील २४८ पदांचा समावेश या आदेशानुसार अमरावती विभागातील २४८ पदांना एक वर्षासाठी मुदतवाढ मिळाली आहे. यामध्ये विभागीय संचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती येथील २0, भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक ७, वरिष्ठ लेखा परिक्षण कार्यालय २ तसेच शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अशा एकूण १५८, शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह अमरावती येथील ६ व यवतमाळ येथील ६, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला ६ पूर्णवेळ व २ अर्धवेळ, यवतमाळ १४ व २, बुलडाणा १५ व २ तसेच भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अमरावती ७ अशा एकूण २४१ पूर्णवेळ व ७ अर्धवेळ अशा अमरावती विभागातील २४८ पदांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Extension of 1734 temporary posts in Directorate of Higher Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.