‘पीएचडी’करिता प्रवेशाच्या तारखेस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:05 PM2018-12-08T13:05:20+5:302018-12-08T13:06:16+5:30
अकोला : अमरावती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशान्वये संशोधन केंद्रावर प्रवेशाद्वारे आचार्य पदवी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, त्याकरिता संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेस कुलगुरूंनी मुदतवाढ दिली आहे.
अकोला : अमरावती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशान्वये संशोधन केंद्रावर प्रवेशाद्वारे आचार्य पदवी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, त्याकरिता संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेस कुलगुरूंनी मुदतवाढ दिली आहे. पीएचडी संदर्भातील नवीन अध्यादेश क्र, १/१६ नुसार संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर होती. ही सर्व प्रक्रिया प्रथमच अमलात आणली जात असल्याने संशोधन करणाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून संशोधन केंद्रावर अध्यादेशाच्या तरतुदीनुसार ‘कोर्स वर्क’करिता पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची अंतिम तिथी २० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, संशोधन केंद्रावर ‘कोर्स वर्क’करिता प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संशोधन केंद्राने १५ जानेवारी २०१९ पर्यंत प्रसिद्ध करावयाची आहे. आचार्य पदवीकरिता संशोधन करण्यास्तव संशोधन केंद्राची प्राथमिक यादी कार्यालयाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली असून, सदर संशोधन केंद्रावर कार्यरत मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांची यादीदेखील संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधन केंद्रास काही अडचण असल्यास पीएचडी सेलचे सहायक कुलसचिव सुजय बंड यांच्याशी संपर्क साधावा, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. एच. आर. देशमुख यांनी कळविले आहे.