अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मुदतवाढ
By दिनेश पठाडे | Published: March 29, 2024 04:58 PM2024-03-29T16:58:39+5:302024-03-29T16:59:17+5:30
२९ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ एप्रिल ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम स्थानकावरून पोहचून अकोलाकडे मार्गस्थ होईल.
वाशिम : अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेकडून वारंवार विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ दिली जाते. मार्चअखेरपर्यंत नियोजित असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला जूनअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
२९ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ एप्रिल ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम स्थानकावरून पोहचून अकोलाकडे मार्गस्थ होईल. ३१ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ७ एप्रिल ते ३० जून २०२४ पर्यंत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन वाशिम स्थानकावर सकाळी ९:१९ वाजता पोहचून दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.
या रेल्वेला पाकाला, पिल्लर, मदनापल्ले, कादरी, धरमावरम, अनंतपूर, ढोणे, कर्नुल सिटी, गाडवाल, महेबुबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली आणि वाशिम स्थानकावर थांबा असणार आहे. उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेला मुदतवाढ मिळाल्यामुळे वाशिमकरांची सोय होणार आहे.