अकोला मार्गे जाणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसचा लालगढपर्यंत विस्तार

By Atul.jaiswal | Published: October 5, 2023 07:30 PM2023-10-05T19:30:21+5:302023-10-05T19:30:36+5:30

ही गाडी आता काचीगुडा-लालगढ-काचीगुडा या नावाने संचालित होणार आहे.

Extension of Kachiguda-Bikaner Express to Lalgarh via Akola |  अकोला मार्गे जाणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसचा लालगढपर्यंत विस्तार

 अकोला मार्गे जाणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसचा लालगढपर्यंत विस्तार

googlenewsNext

अकोला : दक्षिण भारताला उत्तर-पश्चिम भारताशी जोडणाऱ्या काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २८ व ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या गाडीचा विस्तार बिकानेरपासून पुढे असलेल्या लालगढ स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.

ही गाडी आता काचीगुडा-लालगढ-काचीगुडा या नावाने संचालित होणार आहे. ०७०५३ काचीगुडा- लालगढ साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ ऑक्टोबरपर्यंत दर शनिवारी २१:३० वाजता काचीगुडा स्थानकावरून रवाना होऊन सोमवारी १३:३५ वाजता लालगढ स्थानकावर पोहोचणार आहे. ०७०५४ लालगढ- काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ३१ ऑक्टोबरपर्यंत दर मंगळवारी लालगढ स्थानकावरून १०:४५ वाजता रवाना होऊन गुरुवारी ९:४० वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी अकोला मार्गे जाणार असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे.

Web Title: Extension of Kachiguda-Bikaner Express to Lalgarh via Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.