पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी हवी मुदतवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:00 PM2020-03-24T23:00:00+5:302020-03-24T23:00:01+5:30

नियमतीत कर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 Extension required to pay crop loan! | पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी हवी मुदतवाढ !

पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी हवी मुदतवाढ !

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जाची रक्कम ३१ मार्चपर्यंत बँकेत जमा करण्याचा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.पीक कर्जाच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.


पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी हवी मुदतवाढ !

बाजार बंद : शेतकरी अडचणीत

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचार बंदी परिस्थितीत बाजार बंद असल्याने, शेतकरी शेतमाल विकू शकत नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड करणाºयाचा प्रश्न निर्माण झाल्याने, नियमतीत कर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
एक लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी कर्जाची नियमीत परतफेड केल्यास व्याजाची रक्कम भरावी लागत नाही. नियमीत कर्जाच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असते; परंतू कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि लागू करण्यात आलेल्या संचार बंदीच्या परिस्थितीत बाजार बंद आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकरी शेतमाल विकू शकत नसल्याने, कर्जाची रक्कम ३१ मार्चपर्यंत बँकेत जमा करण्याचा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमीत पीक कर्जाच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

बाजार बंद असल्याने सद्यस्थितीत शेतकरी शेतमाल विकू शकत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याने, नियमीत पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी शासनाने शेतकºयांना मुदतवाढ देण्याची गरज आहे.
-शिवाजीराव भरणे
शेतकरी, रामगाव, ता.अकोला.

Web Title:  Extension required to pay crop loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.