शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंंकष प्रयत्न: तिवारी

By admin | Published: September 10, 2015 01:48 AM2015-09-10T01:48:23+5:302015-09-10T01:48:23+5:30

स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून सर्वंंकष प्रयत्न केले जाणार असल्याची किशोर तिवारी यांची ग्वाही.

Extensive efforts to prevent suicides by farmers: Tiwari | शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंंकष प्रयत्न: तिवारी

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंंकष प्रयत्न: तिवारी

Next

वाशिम : शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांनी विदर्भ-मराठवाडा हादरला आहे. यामागील नेमक्या कारणांचा शोध घेवून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून सर्वंंकष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. ९ सप्टेंबर रोजी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या हा चिंतेचा आहे. यांसंदर्भात शासन गंभीर असून सर्वसामान्य शेतकरी कुटूंब तद्वतच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांकरिता शासनस्तरावरुन विविध योजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अन्नसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या सुविधांचा समावेश आहे. सद्यस्थितीत सर्वसामान्य जनता तसेच शेतकर्‍यांचा राजकीय नेते आणि अधिकार्‍यांवर विश्‍वास राहिलेला नाही. मृतकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा घडल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांना ह्यब्रॅण्ड अँम्बेसिडरह्ण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले. शेतकरी स्वावलंबन मिशनअंतर्गत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसह विदर्भातील वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत शेतकर्‍यांना जाणवणार्‍या अडचणी, त्यांना शासनाकडून कुठले सहकार्य अपेक्षित आहे यासह शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेवून तसा परिपूर्ण अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल. एवढेच नव्हे; तर शेतकर्‍यांना पतपुरवठा वेळेवर व्हायला हवा, सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळावे, त्याने उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव मिळावा, शासनस्तरावरुन जाहीर होणार्‍या योजनांचा कुठल्याही अडचणीविना लाभ मिळावा, आदींकरिता यापुढेही लढा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती.

*कामचुकार अधिका-यांवर कारवाई व्हायलाच हवी

         पावसातील अनियमिततेमुळे खरिप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले . अशाही अवस्थेत काही शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय असताना त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. ह्यइन्फ्रा-२ह्ण च्या कामांची गती मंदावल्याने शेतकर्‍यांना ह्यट्रान्सफार्मरह्ण मिळणे कठीण झाले आहे. आजही अनेक बँकांनी अद्यापही शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ दिलेला नाही. एकूणच या सर्व बाबींचा शेतीवर विपरित परिणाम होत असून वाशिम जिल्ह्यात एकट्या ऑगस्ट महिण्यांत १४ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधित विभागातील कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशा सूचना आपण शासनाकडे केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली.

Web Title: Extensive efforts to prevent suicides by farmers: Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.