‘त्या’ अत्यवस्थ व्यक्तीची ओळख पटली; भावाकडे केले स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:19 AM2021-03-08T04:19:08+5:302021-03-08T04:19:08+5:30
अनेक दिवसांपासून जितापूर नाकट गावाजवळ असह्य वेदना सहन करीत रस्त्याच्या कडेला पडलेल्या एक ७० वर्षीय वृध्दास येथील लक्ष्मीबाई देशमुख ...
अनेक दिवसांपासून जितापूर नाकट गावाजवळ असह्य वेदना सहन करीत रस्त्याच्या कडेला पडलेल्या एक ७० वर्षीय वृध्दास येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ शुक्रवारी वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या टिमने दाखल केले.
या संदर्भात एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन नाकट यांनी येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाला दिली. आपत्कालीन पथकाने घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेतून सदर अज्ञात ७० वर्षीय व्यक्तीला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारार्थ दाखल केले, या आशयाचे वृत्त ‘लोकमत'ने शनिवारी प्रकाशित करतातच ते वृत्त वाचून विनायक विष्णुपंत मुळे हे येथील रुग्णालयात दाखल झाले. त्यांचे लहान भाऊ संजय विष्णुपंत मुळे (७०) राहणार जठारपेठ अकोला हे मनोरुग्ण असल्याने अनेक वेळा घरुन निघुन ते ३० अॉक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घरुन निघुन गेले. तेव्हा पासून बेपत्ता होते, या बाबत रामदासपेठ पोलीस स्टेशनला ते हरविल्याची तक्रार १६ जानेवारी रोजी दाखल केले. परंतू वृत्तामुळे ते आपले धाकटे बंधू असल्याचे लक्षात आले. यावरुन आपण मूर्तिजापूर येथील रुग्णालय गाठून त्यांची ओळख पटवून आपल्या सोबत घेतल्याचे विनायक मुळे यांनी सांगितले. तसा जबाब मूर्तिजापूर पोलीसांना लेखी दिला आहे. यावेळी वृत्तपत्राचे व वंदेमातरम आपत्कालीन पथकाचे विशेष आभार मानले.