आगर येथे पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:38+5:302021-05-05T04:31:38+5:30

चान्नी-वाडेगाव मार्गावरील पुलाची दुरवस्था खेट्री : चान्नी-वाडेगाव मार्गावरील सस्तीजवळील वघाडी नाल्यावरील पुलाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ...

Extreme water scarcity at Agar | आगर येथे पाण्याची भीषण टंचाई

आगर येथे पाण्याची भीषण टंचाई

Next

चान्नी-वाडेगाव मार्गावरील पुलाची दुरवस्था

खेट्री : चान्नी-वाडेगाव मार्गावरील सस्तीजवळील वघाडी नाल्यावरील पुलाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत असून, अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. याकडे संबंधित व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

पिंजर परिसरात पाणीपुरवठा खंडित

निहिदा : बार्शी टाकळी पंचायत समितीअंतर्गत असलेले पिंजर येथे ग्रामसेवक येत नसल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत असल्याचे चित्र आहे. ग्रामसेवक गावात उपस्थित राहत नसल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांची भटकंती होत असल्याचे चित्र आहे. तसेच नागरिकांना कागदपत्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

वाडेगाव : मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन

बार्शीटाकळी : शहरासह तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, काेराेनाविषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून, नियमांचे उल्लंघन हाेत आहे. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

बाळापूर : परिसरासह तालुक्यातील पाणंद रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी राेजगार हमी याेजनेतून पाणंद रस्त्याची दुरुस्तीची मागणी हाेत आहे.

बोरगाव मंजू येथे मोबाइल सेवेचा फज्जा

बाेरगाव मंजू : बीएसएनएल तसेच इतर मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कअभावी गत अनेक महिन्यांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाइल सेवा तासन‌्तास खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

------------------------------

बंदी असतानाही गुटख्याची विक्री

अकोट : गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही तालुक्यात अनेक भागात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित

आगर : घरकूल लाभार्थी यादी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकूल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Extreme water scarcity at Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.