पाण्याचा वारेमाप उपसा पर्यावरण संतुलनासाठी घातक - हरिदास ताठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 01:34 PM2022-03-24T13:34:43+5:302022-03-24T13:34:49+5:30
Excavation of water : पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला.
अ ोला : भूगर्भात असलेले ३० टक्के पाणी हे हजाराे वर्षांपासून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा आहे. पाणी जमिनीत मुरण्याचा कालावधी हा १०० ते एक हजार वर्षापर्यंत एवढा माेठा आहे. आपण मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या पाण्याचा वारेमाप उपसा करत आहाेत. हे पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते मंचावर जिल्हाधिकारी निमा अराेरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, जलसंपदा विभागाच्या श्रीमती महाजन, प्रीती शेंडे आदी उपस्थित होते. ताठे म्हणाले की, जगाचा ७० टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे त्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्राचे आहे. केवळ ३ टक्केच पाणी जमिनीवर आहे. या ३ टक्क्यांच्या ६९ टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असून ३० टक्के पाणी हे भूगर्भात आहे. केवळ १ टक्केच पाणी तलाव, विहिरी व मानवनिर्मित धरणांमध्ये आहे. अशा स्थितीत तब्बल एक ते दाेन हजार फुट खाेल जाऊन पाण्याचा उपसा करण्याचा प्रकार हा अतिशय घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला. पाण्याचे साठे मर्यादित असून त्यांचा वापर योग्य व काटकसरीणे करणे आवश्यक आहे. जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावे याकरिता जलजागृती सप्ताह राबविला जातो. त्याअनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाव्दारे जनजागृती, पाणी बचतीबाबत चर्चा सत्र, विद्यालयात विद्यार्थ्यांना जलजागृतीबाबत संबोधन, वॉटर रन, रांगोळी व निबंध स्पर्धेव्दारे जलजागृती करण्यात आली, अशी माहिती अ.खु. वसुलकर यांनी प्रास्ताविकातून दिली. जलजागृती सप्ताहात निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सामूहिक जलप्रतिज्ञा झाली. तर हास्यकवी प्रशांत भोंडे यांनी कवितेच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपिका गावंडे यांनी केले.