फेसबुकवरची लव्हस्टोरी; प्रियकर-प्रेयसीचे पलायन!

By admin | Published: April 28, 2017 01:53 AM2017-04-28T01:53:57+5:302017-04-28T01:53:57+5:30

अकोला: फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रेमात पडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत, अशी एक घटना गुरुवारी उघडकीस आली.

Facebook's Lovestory; Lover-beloved escape! | फेसबुकवरची लव्हस्टोरी; प्रियकर-प्रेयसीचे पलायन!

फेसबुकवरची लव्हस्टोरी; प्रियकर-प्रेयसीचे पलायन!

Next

अकोला: फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रेमात पडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत, अशी एक घटना गुरुवारी उघडकीस आली. फेसबुकवर चॅटिंग करताना एक अल्पवयीन मुलगी जयपूर येथील एका युवकाच्या प्रेमात पडली. त्यांची लव्हस्टोरी बहरत गेली आणि दोघांनी २५ एप्रिल रोजी पलायन केले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
प्रेमाला वयाचे बंधन नसते. ते कधी आणि कोठेही होऊ शकते. फेसबुक चॅटिंग करताना तेल्हारा येथील एक अल्पवयीन मुलगी एका युवकाच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेम बहरत गेले. प्रेमात दोघांनी सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या. युवकही जयपूर येथून अधूनमधून अकोल्यात यायला लागला. भेटी-गाठी होऊ लागल्या. दरम्यान, जयपूर येथील युवकाने अकोल्यात एकेठिकाणी शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्यामुळे दोघांच्याही भेटी-गाठी नियमित होऊ लागल्या. २५ एप्रिल रोजी प्रियकर व प्रेयसी दोघेही आकाशवाणीजवळून जयपूरला पळून गेले. दोन दिवस उलटूनही मुलगी घरी परतली नाही किंवा संपर्क नाही, म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अज्ञात युवकाने त्यांच्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, युवकासह मुलगी जयपूरला गेली. युवकाचे वडील पोलीस खात्यात असल्याने, त्यांना मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी मुलीला अकोल्यात परत पाठविण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत मुलगी अकोल्यात दाखल झाली नव्हती. मुलगी अकोल्यात आल्यावर तिला पालकांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Facebook's Lovestory; Lover-beloved escape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.