हद्दवाढ भागात सुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:57+5:302021-08-15T04:20:57+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभाग व जनहित कक्षाच्यावतीने निवेदन देताना अॅड. नंदकिशोर शेळके, सरचिटणीस अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभाग व जनहित कक्षाच्यावतीने निवेदन देताना अॅड. नंदकिशोर शेळके, सरचिटणीस अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. अनिस शाह, अॅड. राजेश पवार, अॅड. राजाराम उमाळे, नीलेश संगवई, जगदीश गडकरी, आदींची उपस्थिती होती.
...........................
गोरक्षण मार्गावर ७५ स्थळी ध्वजारोहण
अकोला : जिल्हा राकाँ व महानगर राकाँच्या नेतृत्वात व आनंद वानखडे मित्र परिवाराच्या वतीने स्थानीय गोरक्षण मार्गावरील गोरक्षण संस्था परिसरात स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवात गोरक्षण मार्गावर ७५ ठिकाणी एकाच प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार असून, एका वेळेस ७५ ठिकाणी ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
.....................
आज सामूहिक श्रमदान
अकोला : ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिन आज, रविवारी (दि. १५ ऑगस्ट) भव्य सामूहिक श्रमदानाचे महानगरात आयोजन करण्यात आले आहे. पंकज जायले, नगरसेवक मंगेश काळे यांच्या अभिनव संकल्पेतून स्थानिक अशोक वाटिका ते जिल्हा सामान्य रुगणालयपर्यंत श्रमदानातून स्वच्छता मोहीम, तसेच दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
.......................