...खरं म्हणजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही; विट्ठल  वाघांची कविता करते अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:41 PM2019-03-19T13:41:48+5:302019-03-19T13:42:24+5:30

अकोला - साहेबराव करपे...खरे तर या नावाला कुठलेच वलय नाही, हा व्यक्ती स्टारही नव्हता, कोणी राजकारणीही नव्हता, मात्र आज ...

In fact, Sahebrao did not commit suicide; Vittal Vagh's poetry | ...खरं म्हणजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही; विट्ठल  वाघांची कविता करते अंतर्मुख

...खरं म्हणजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही; विट्ठल  वाघांची कविता करते अंतर्मुख

अकोला- साहेबराव करपे...खरे तर या नावाला कुठलेच वलय नाही, हा व्यक्ती स्टारही नव्हता, कोणी राजकारणीही नव्हता, मात्र आज १९ मार्च रोजी या व्यक्तीचे स्मरण उभा महाराष्टÑ करीत आहे...कोण होते साहेबराव...ते होते एक शेतकरी..आज देशात शेतकरी आत्महत्यांचे जे सत्र सुरू आहे त्या शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण कुटूंबासह आत्मघात त्यांनी केला. दिवस होता १९मार्च १९८६ या दिवशी साहेबराव करपे मु.चिलगव्हाण ता महागाव जि यवतमाळ यांनी आपल्या तीन मुली, एक मुलगा आणि पत्नीसह  आत्महत्या केली..सव्वाशे एकर शेतीचा मालक असलेल्या व  एकरभर पसरलेल्या वाड्याचे मालक असलेले साहेबराव करपे पाटील देशातल्या क्रूर व्यवस्थेचे बळी ठरले..आज या घटनेला  ३३ वर्ष झाली..हजारो लोकांनी आज अन्नत्याग करून अन्नदात्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत...या घटनेच्या निमित्ताने  वºहाडी कवी डॉ.विठ्ठल वाघ यांनी त्यावेळी लहिलेली कविता आजही अनेकांची मने हेलावून टाकते ते म्हणतात. ....खरं म्हणजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही.

 

साहेबराव पाटील या कवितेचे काही अंश....

 

....खरं म्हणजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही.

आमीच तुहा खून केला..तुहा अन तुह्या बायकोपोराईचाही.

तू गेल्याची बातमी आली त्यावक्ती मी बियरवर ताव मारत होतो

आळव्या हातानं बियार्नी झोळत होतो..

असाच, तू कापसाच्या भावासाठी वारक?्याच्या भक्तीभावानं दिंडीत चालला होता..

त्यावक्ती मी "महात्मा फुले" चौकात

पानठेल्यावर चारमिनारचे झुरके घेत होतो.

हवेत धूर सोळत होतो

मनातल्या मनात तुही किव करत होतो..

 

साहेबराव- तू त्या मुंगीसारखाच

-अन या भक्कम सातपुळ्यासारखाई- तू कैलासावरचा महादेव !

म्हणूनच तू हे ईख पचवू शकला...अन एकडावचा सुटला..

पन तुह्या गावोगावच्या भाईबंदात

हिंमत नसते रे एवढी ..आभायाचं कायीज फाळून टाकनारी..

म्हनून ते तुयासारखे असं एकदम मरन्यापेक्षा

रोज रोज थोळथोळ मरत असतात..

आपलं उपाशी पोट पाठीच्या नेट उभं करत

ढेरपोट्याइले पोसत असतात..

आपुन मातर थोळथोळ रोजरोज मरत असतात..

तुह सरन पेटल्यावर मसनात एक म्हातारा सांगत होता म्हंतात-

"आता कापूसजवारी पेरसान त लेकहो हराम मौतींन मरसान

आता पेरा तासातासानं लोखंडी दगळी गोटे चारी मेरीनं खम्मन काटे...

Web Title: In fact, Sahebrao did not commit suicide; Vittal Vagh's poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.