धडक सिंचन योजनेतील विहिरी ‘नरेगा’मध्ये वर्ग!
By Admin | Published: January 29, 2015 11:29 PM2015-01-29T23:29:48+5:302015-01-29T23:29:48+5:30
अमरावती विभागातील १३ हजारांवर सिंचन विहिरींचा समावेश.
संतोष येलकर/अकोला:
धडक सिंचन विहीर योजनेतील सिंचन विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) वर्ग करण्याची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील १३ हजार ८00 सिंचन विहिरींचा समावेश आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २00६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्यांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली. तसेच धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण आणि प्रगतीपथावरील सिंचन विहिरी वगळता शिल्लक असलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील शिल्लक असलेल्या सिंचन विहिरींची कामे ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील धडक सिंचन विहिरी योजनेतील १३ हजार ८२0 सिंचन विहिरींची कामे ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आली आहेत. ह्यनरेगाह्णअंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्यांना तीन लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे.
अमरावती विभागाचे उपआयुक्त (रोहयो) एस.टी.टाकसाळे यांनी धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात १३ हजार ८२0 सिंचन विहिरी ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आल्या असल्याचे सांगीतले. या सिंचन विहिरींचे खोदकाम मार्चअखेर आणि बांधकाम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* ३१ मार्चपूर्वी खोदकाम; जूनअखेर बांधकामाचे निर्देश!
धडक सिंचन विहीर योजनेतून ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे खोदकाम येत्या ३१ मार्चपर्यंत आणि बांधकाम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहयो विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांना देण्यात आले आहेत.
*'नरेगा'मध्ये वर्ग जिल्हानिहाय विहिरी!
जिल्हा विहिरी
अमरावती ३७३३
यवतमाळ ४९१0
अकोला १५0४
बुलडाणा २३८0
वाशिम १२९३
....................
एकूण १३८२0