युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:19 PM2018-06-23T14:19:58+5:302018-06-23T14:22:11+5:30

अकोला: युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

Fake Facebook account by the name of the victim! | युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग!

युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग!

Next
ठळक मुद्देमैत्रिणीने तिला तुझे फेसबुकवर अकाउंट उघडले का? असे विचारल्यावर त्या युवकाच्या बहिणीने नाही, असे उत्तर दिले. शोध घेतला असता, त्या युवतीच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंट उघडलेले असल्याचे दिसून आले . त्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंगसुद्धा केल्याचे दिसून आले, तसेच काही छायाचित्रेसुद्धा त्यावर टाकलेली दिसली.

अकोला: युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवकाने दिलेल्या तक्रारीत काही दिवसांपूर्वी त्याच्या मोठी बहिणीची मैत्रिण त्यांच्या घरी आली. यावेळी या मैत्रिणीने तिला तुझे फेसबुकवर अकाउंट उघडले का? असे विचारल्यावर त्या युवकाच्या बहिणीने नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे त्यांनी फेसबुक उघडल््यावर तिच्या नावाने अकाउंट आहे की नाही, याचा शोध घेतला असता, त्या युवतीच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंट उघडलेले असल्याचे दिसून आले आणि एवढेच नाही तर त्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंगसुद्धा केल्याचे दिसून आले, तसेच काही छायाचित्रेसुद्धा त्यावर टाकलेली दिसली. आपल्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर करीत असल्याने, युवकाने तातडीने खदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४१९ आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (क) नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Fake Facebook account by the name of the victim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.