धावत्या बसवर कोसळले झाड ; ४५ प्रवासी थोडक्यात वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 05:42 PM2019-08-03T17:42:53+5:302019-08-03T17:48:40+5:30

दिग्रस बु. (अकोला): धावत्या बसवर झाड कोसळल्याची घटना दिग्रस बु बस स्थानकाजवळ शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.

A fallen tree on a running bus; travelers escape briefly | धावत्या बसवर कोसळले झाड ; ४५ प्रवासी थोडक्यात वाचले

धावत्या बसवर कोसळले झाड ; ४५ प्रवासी थोडक्यात वाचले

Next
ठळक मुद्देअकोला ते सावरगाव बस क्रमांक एमएच ४० वाय ५३३१ ही अकोलाकडे परत जात होती.बसस्थानकपासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावर धावत्या बसवर बाभळीचे झाड कोसळले. सुदैवाने हे झाड बसच्या टपावर अडकल्याने अपघात टळला.

दिग्रस बु. (अकोला): धावत्या बसवर झाड कोसळल्याची घटना दिग्रस बु बस स्थानकाजवळ शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. सुदैवाने हे झाड बसवर अडकल्याने मोठा अपघात टळल्याने ४५ प्रवाशी बचावले. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतुक ठप्प होउन दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अकोला ते सावरगाव बस क्रमांक एमएच ४० वाय ५३३१ ही अकोलाकडे परत जात होती. दरम्यान, दिग्रस बु बसस्थानकपासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावर धावत्या बसवर बाभळीचे झाड कोसळले. सुदैवाने हे झाड बसच्या टपावर अडकल्याने अपघात टळला. या बसमध्ये ४५ प्रवाशी प्रवास करीत होते.घटनेनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. झाड अडकल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक ठप्प होउन दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी झाड पडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून गेले. चालक अनिल सरप यांनी झाडे तोडणारया व्यक्तीला बोलावून ते झाड बाजूला केले.यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे बिट जमादार गाठेकर, पोलीस पाटील नितीनकुमार गवई, घटनास्थळी पोहचले गावतील युवक आकाश गवई, अजय तायडे, सुधाकर कराळे, ओम गावंडे, सावन गवई ,दिपक गवई, संदिप गवई आदींनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आणि रस्त्यामध्ये पडलेले झाड बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. (वार्ताहर)

 

Web Title: A fallen tree on a running bus; travelers escape briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.