बोटाला लावा शाई, सशक्त होईल लोकशाही..

By admin | Published: October 9, 2014 01:08 AM2014-10-09T01:08:56+5:302014-10-09T01:08:56+5:30

प्रथमच अकोला पोलिसांकडूनही मतदाता जनजागृती.

False lava ink, strong democracy .. | बोटाला लावा शाई, सशक्त होईल लोकशाही..

बोटाला लावा शाई, सशक्त होईल लोकशाही..

Next

अकोला: ह्यबोटाला लावा शाई, सशक्त होईल लोकशाहीह्ण, असा संदेश देत बुधवारी सायंकाळी शहरातील रामदासपेठ व कोतवाली पोलिस ठाण्यांमधून पोलिस कर्मचार्‍यांनी रॅली काढून मतदारांनी लाखोंच्या संख्येने कुटुंबासह घराबाहेर पडून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाणे व रामदासपेठ पोलिस ठाण्यातून जनजागृती रॅली काढली. निवडणूक काळादरम्यान पोलिसांनी जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असेल.
रॅली, मोर्चे, आंदोलन करणार्‍या संस्थांना संरक्षण प्रदान करणारे पोलिस कर्मचारी बुधवारी सायंकाळी पहिल्यांदा मतदार जनजागृतीचे संदेश लिहिलेले फलक हाती घेऊन रस्त्यांवर उतरताना दिसल्याने नागरिकही आश्‍चर्यचकीत झाले. समाजाच्या संरक्षणाचे कर्तव्य बजावित असतानाच, मतदान करणे किती महत्त्वाचे आहे. मतदानामुळे लोकशाही कशी बळकट होते. याच्या घोषणा देत पोलिस प्रशिक्षण केंद्रातील १५0 च्यावर पोलिस कर्मचार्‍यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध आढाव, रामदासपेठचे ठाणेदार सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचार्‍यांनीही जनजागृती रॅली काढली. ह्य१५ ऑक्टोबर सात ते सहा, आपल्या केंद्रावर हजर राहाह्ण, ह्यशोभून दिसेल बोटावर शाई, सशक्त होईल ही लोकशाहीह्ण यासह अनेक प्रभावी संदेश मतदारांपर्यंत पोलिस कर्मचार्‍यांनी पोहोचले.

Web Title: False lava ink, strong democracy ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.