कुटुंब नियोजनाचे गणित गडबडले!

By admin | Published: September 25, 2015 12:59 AM2015-09-25T00:59:53+5:302015-09-25T00:59:53+5:30

७ हजार १६३ कुटुंब नियोजनाच्या उद्दिष्टापैकी केवळ १५00 शस्त्रक्रिया.

Family planning math disturbed! | कुटुंब नियोजनाचे गणित गडबडले!

कुटुंब नियोजनाचे गणित गडबडले!

Next

अकोला: वाढत्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजना सुरू केली. योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हय़ातील आरोग्य विभागाला दरवर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिल्या जाते. परंतु दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य यंत्रणेला सातत्याने अपयश येत असल्याने कुटुंब नियोजनाचे गणित गडबडले आहे. यावर्षी आरोग्य विभागाला ७ हजार १६३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु आरोग्य विभागाने उद्दिष्टाला बगल देत केवळ १ हजार ५६७ शस्त्रक्रिया केल्या. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ह्यहम दो, हमारे दोह्ण असा संदेश देत, आरोग्य विभागांतर्गत देशभरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची योजना सुरू केली आणि ही योजना यशस्वी करणार्‍या, अधिकाधिक स्त्री-पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करणार्‍या आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविकाला प्रत्येक शस्त्रक्रियेमागे रोख बक्षीससुद्धा दिले जाते. एवढेच नाहीतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणार्‍या स्त्री-पुरुषालासुद्धा रोख रक्कम दिली जाते. असे असतानाही आरोग्य विभागाकडून मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजनेलाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न होत आहे. कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहेत. यंदा २0१५ व १६ या वर्षासाठी ७ हजार १६३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट दिले होते. परंतु आरोग्य विभागाने १ हजार ५६७ शस्त्रक्रिया केल्या. दिलेल्या उद्दिष्टापैकी ५ हजार ५९६ शस्त्रक्रिया कमी आहेत. कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातही तालुक्यांमध्ये शिबिर घेण्यात येईल. आरोग्य विभागाकडून पुरुष शस्त्रक्रियेवर भर देण्यात येत आहे. दिलेले उद्दिष्ट लवकरच आम्ही पूर्ण करू, असा विश्‍वास असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगीतले.

Web Title: Family planning math disturbed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.