प्रभागनिहाय आरक्षणाची सूचना होणार प्रसिद्ध

By admin | Published: October 4, 2016 02:32 AM2016-10-04T02:32:12+5:302016-10-04T02:32:12+5:30

अकोला मनपात सोमवारी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम करण्यात आली.

Famous for suggestions of ward caste reservation | प्रभागनिहाय आरक्षणाची सूचना होणार प्रसिद्ध

प्रभागनिहाय आरक्षणाची सूचना होणार प्रसिद्ध

Next

अकोला, दि. ३- महापालिका निवडणुकीसाठी जातीनिहाय प्रवर्गाच्या आरक्षणाची सूचना उद्या (मंगळवार) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाईल. पूर्वतयारी म्हणून सोमवारी महापालिकेत अधिकार्‍यांच्या दालनात आरक्षण सोडतीची रंगीत तालीम करण्यात आली.
महापालिकेची फेब्रुवारी २0१७ मध्ये निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आयुक्त अजय लहाने यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपवली आहे. प्रभाग पुनर्रचनेचे काम आटोपल्यानंतर आता प्रशासनाने आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे होईल. आजरोजी ३६ प्रभागांत ७३ नगरसेवक आहेत. मनपात समाविष्ट झालेल्या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ गृहीत धरून पालिका प्रशासनाने प्रभागांची पुनर्रचना केली. यामध्ये चार नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग, या प्रक्रियेनुसार २0 प्रभागांची रचना करण्यात आली. २0 प्रभागांमधून ८0 नगरसेवक निवडून येणार आहेत. अर्थातच यामध्ये नियमानुसार ५0 टक्के महिलांचे आरक्षण असून एकूण ८0 जागांसाठीदेखील लोकसंख्येचे निकष व जातीनिहाय प्रवर्गाचे निकष लक्षात ठेवून आरक्षण काढल्या जाईल. त्यासाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ४ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सूचना प्रसिद्ध केल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतसाठी पूर्वतयारी म्हणून सोमवारी मनपात उपायुक्त समाधान सोळंके यांच्या दालनात रंगीत तालीम करण्यात आल्याची माहिती आहे.

नकाशे अंदाज चुकविणार
ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्याच दिवशी मनपात प्रभाग पुनर्रचेनेचे नकाशे प्रसिद्ध केले जातील; परंतु नकाशांमध्ये त्या-त्या भागाचा नावानिशी उल्लेख नसल्याने इच्छुकांना अंदाज-आडाखे जुळवण्यासाठी डोके खाजवावे लागेल, हे निश्‍चित.
पूर्वतयारीसाठी आयोगाचे निर्देश
आरक्षणाची सोडत काढण्यापूर्वी किमान दोन वेळा रंगीत तालीम करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून रंगीत तालीम करण्यात आली.
लोकसंख्येचा उल्लेख असावा!
आरक्षणाची सोडत ही संबंधित जातनिहाय प्रवर्गानुसार निघणार आहे. अर्थातच, त्या-त्या प्रभागातील जातीनिहाय लोकसंख्येची माहिती नागरिकांना उपलब्ध असणे अपेक्षित आहे; मात्र ७ ऑक्टोबरला नकाशे प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये लोकसंख्येचा उल्लेख केला जाणार नसल्याची माहिती आहे.

Web Title: Famous for suggestions of ward caste reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.