फनी चक्रीवादळाचा विदर्भाला तात्पुरता दिलासा; तापमान घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:00 PM2019-05-04T14:00:41+5:302019-05-04T14:00:48+5:30
अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, शुक्रवार, ३ मे रोजी ५.३० वाजतापर्यंत विदर्भात सर्वाधिक ४४.९ कमाल तापमानाची नोंद वर्धा तर सर्वात कमी बुलडाणा येथे ३८.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
मागील १० दिवसांपासून विदर्भाचे कमाल तापमानाचा आलेख वाढताच होता. २८ एप्रिल रोजी सर्व विक्रम मोडत अकोल्याचे कमाल तापमान ४७.२ अंशावर गेल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांना घराबाहेबर निघणे कठीण झाले. उष्माघाताने मृत्यू झाले. अकोल्यात तीन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. याच दरम्यान, बंगालच्या उपसागरातून ओडीशा व दक्षिणी राज्यात फोनी चक्रीवादळ पोहोचले. त्याचा परिणाम कमाल तापमानावर झाला असून, विदर्भातील कमाल तापमान ४ ते ५ अंशाने घटले. शुक्रवारी अकोल्याचे कमाल तापमान ४२.१,अमरावती ४२.०, यवतमाळ ४२.०, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.२, नागपूर ४३.६ अंश अशी नागपूर हवामानशास्त्र कें द्राने नोंद केली.