शेत मशागत मंद गतीने!

By admin | Published: April 13, 2016 01:29 AM2016-04-13T01:29:06+5:302016-04-13T01:29:06+5:30

अकोला जिल्ह्यात मागील वर्षी ३0 टक्के क्षेत्र नापेर; हातात पैसा नाही.

Farm farming slow down! | शेत मशागत मंद गतीने!

शेत मशागत मंद गतीने!

Next

अकोला : शेतकर्‍यांच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे यावर्षी एप्रिल महिना उजाडला, तरी शेत मशागतीच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. यातच जमीन कडक असल्याने नांगरटी करणे शक्य नाही आणि शासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
अकोला जिल्हय़ात खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र ४ लाख ८२ हजार हेक्टर असून, मागीलवर्षी अल्प पावसामुळे २0 ते ३0 टक्के क्षेत्र नापेर राहिले आहे. ज्या शेतकर्‍यांनी धाडस करून पेरणी केली त्यांचे उत्पादन प्रचंड घटले असून, सोयाबीनचा एकरी उतारा ५0 किलो ते दीड क्विंटलपर्यंत आला आहे. कापसच्या उत्पादनातही घट झाली, तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे.
मागील दहा वर्षांपासून शेतकरी या संकटाचा सामना करीत असून, पावसाची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांचे उत्पादन,उत्पन्न वाढले नाही, हमी दरात सुधारले नाही. परिणामी, उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकर्‍यांकडे पैसाच शिल्लक नाही. मागीलवर्षी पुन्हा निसर्गाने अवकृपा दाखवल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली असून, आजमितीस शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे.
शेतकर्‍यांना उदरनिर्वाह करणे, कुटुंबाचे गुजराण, मुला-मुलींचे लग्न, शाळेचा खर्च यातच शेतकरी पुरता खचला असून, हातात शेत मशागतीसाठी पैसाच नसल्याने विदर्भातील ९0 टक्के भूधारक, अल्पभूधारक शेतकर्‍यांची अवस्था वाईट आहे. तुकड्याची शेती करताना, शेतकर्‍यांना कठीण होत असून, उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक वाढल्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या आर्थिक, सामाजिक जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. कर्जाचा डोंगर वाढल्याने या दुष्काळात, शेतकर्‍यांनी शेती विकायला काढली असून, शेकडो शेतकर्‍यांनी शेती ठोक्याने काढली आहे.

Web Title: Farm farming slow down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.