धानोरा येथील शेत रस्त्याचा रपटा गेला वाहून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:30+5:302021-06-17T04:14:30+5:30
सदर रपट्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच रपटा वाहून गेला असल्याचा आरोप सरपंच मोनिका म्हसाये यांनी केला आहे. पहिल्याच पाण्यात ...
सदर रपट्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच रपटा वाहून गेला असल्याचा आरोप सरपंच मोनिका म्हसाये यांनी केला आहे. पहिल्याच पाण्यात रपटा खचून वाहून गेल्याने या रस्त्याने शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. रपटा पूर्णपणे खरडून गेल्याने पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व बी-बियाणे, खते बांधावर नेणे शक्य नाही. या रस्त्यावरील ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. धानोरा पाटेकर येथील शेतकऱ्यांची जवळपास २०० हेक्टर जमीन ही याच रस्त्यावर आहे. आता रपटा वाहून गेल्याने शेती पेरायची कशी, हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
याबाबत सरपंच मोनिका अक्षय म्हसाये यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निवेदनही सादर केले. सदर रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा; अन्यथा उपोषण करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
फोटो :