अनेक वर्षांपासून शेतरस्ता दुरुस्तीचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:34+5:302021-07-14T04:22:34+5:30
बाळापूर मार्गावरील नारायण महाराज संस्थानपासून सिंगर नाल्यापर्यंत अंदाजे चार किलोमीटर अंतर असलेला जुना बटवाडी शेत रस्ता दुरुस्ती बाबतीत तत्कालीन ...
बाळापूर मार्गावरील नारायण महाराज संस्थानपासून सिंगर नाल्यापर्यंत अंदाजे चार किलोमीटर अंतर असलेला जुना बटवाडी शेत रस्ता दुरुस्ती बाबतीत तत्कालीन पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात संबधित शेतकऱ्यांनी निवेदन दिले असता, सदर रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मंजुरात मिळून रस्त्याचे अंदाजपत्रकही काढले होते, परंतु शासन स्तरावरील बदलत्या धोरणामुळे अद्यापही शेतरस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी कामे करण्यासाठी रस्त्याने ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शेतकरी बांधवांना शेतमाल घरापर्यंत नेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतरस्ते दुरुस्ती करून देण्याची मागणी होत आहे.
संबंधित विभागाने शेतरस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतरस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
- प्रकाश पाटीलखेडे, शेतकरी वाडेगाव