तब्बल दहा वर्षांनंतर शेतरस्त्याचे बांधकाम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:17+5:302021-03-25T04:18:17+5:30
पातूर शहरातून नानासाहेब मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्ता अपघातप्रवण होता. शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या रस्त्याचे अखेर भाग्य ...
पातूर शहरातून नानासाहेब मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्ता अपघातप्रवण होता. शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या रस्त्याचे अखेर भाग्य खुलले आणि तब्बल दहा वर्षांनंतर या रस्त्याला सुगीचे दिवस आले. आमदार नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांनी मंगळवारपासून बांधकामाला सुरुवात होणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेनेचे पातूर शहरप्रमुख अजय ढोणे, अरुण कचाले, दिलीप बोचे, ॲड. सूरज झडपे, गोपाल ढोरे, माजी तालुकाप्रमुख गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप सदार, पंचायत समितीचे सदस्य गोपाल ढोरे, राजेश भगत, शिर्ला ग्रामपंचायतीचे सदस्य सागर कढोणे, पातूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद देशमुख, शिवसेनेचे उपशहरप्रमुख शंकर देशमुख, डिगांबर खुरसडे, सागर रामेकर, उपसरपंच कल्पना खर्डे, जनार्दन डाखोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पातूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष परशराम उंबरकर, सुनील घाडगे, अंकुश बर्डे, सचिन इंगळे, विजय देवकर, उमेश शिंदे, अनिल निमकडे, अंबादास देवकर, ग्रामपंचायत सदस्य परमानंद येनकर, फिरोज भाई, बंडूभाऊ देवकर, संजय काशीद, प्रदीप काळपांडे, शिर्ला ग्रामपंचायतीचे सदस्य मंगल डोंगरे, मोहन गाडगे उपस्थित होते. संचालन विश्वजित इंगळे यांनी केले.
फोटाे: