शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावेत!

By admin | Published: December 8, 2014 01:16 AM2014-12-08T01:16:59+5:302014-12-08T01:16:59+5:30

शेतक-यांच्या सहमतीने धोरण निश्‍चित व्हावे; आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत शेती विकासाचे ठराव.

Farm should get prices based on the cost of production! | शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावेत!

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावेत!

Next

अकोला : शेती करणारे देशच भविष्यात जगाला अन्नधान्य पुरविणार आहेत. पर्यावरण संतुलनही शेतकरीच राखू शकतो, पण शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला पूरक भाव मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी खचला असून, हा प्रश्न सर्व जगालाच भेडसावत आहे. म्हणूनच शेतकर्‍यांना पूरक भाव मिळावेत, यासाठी शेतीसंबंधीचे धोरण ठरवताना शेतकर्‍यांचा सहभाग असला पाहिजे, यासह अनेक महत्त्वपूर्ण ठराव या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी संवाद- २0१४ मध्ये पारित करण्यात आल्याची माहिती, या परिसंवादाच्या समारोपप्रसंगी फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनलचे अध्यक्ष फिल जेफ्रिस (आस्ट्रेलिया) यांनी दिली. आंतरराष्ट्रीय महिला सबलीकरण वर्षाचे औचित्य साधून ह्यशेतकरी महिलांचे सबलीकरण आणि उत्पन्नवाढीचे तंत्रज्ञानह्ण या विषयावरील चार दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवाद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. रविवार, ७ डिसेंबर रोजी या परिसंवादाचा समारोप झाला. या परिसंवादात ह्यशेतकरी महिलांचे सबलीकरण आणि उत् पन्नवाढीचे तंत्रज्ञानह्ण या विषयावर चार दिवस जगातील अकरा देशाचे कृषी शास्त्रज्ञ, शेतकर्‍यांनी मंथन केले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल) सचिव जीम वेगन (इंग्लड) यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी होते. या परिसंवादादरम्यान, जगभरातून आलेल्या शेतकरी, तज्ज्ञांनी विदर्भातील आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबाना भेटी दिल्या आणि शेतावरील प्रयोगही बघितले. या प्रतिकूल परिस्थितीत येथील शेतकरी शेतीचे संरक्षण करतात; परंतु पूरक भाव नाही, कर्ज वाढतच असल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे एकूण विदारक चित्र समोर आले आहे. महिला उत्तम शेती करीत असल्याचे या भेटीतून पुढे आले आहे. याकरिता शेतकर्‍यांना सतत प्रेरणा मिळत रहावी आणि महिलांचे सक्षमीकरण वाढवावे लागणार असल्याचे जेफ्रीस यांनी म्हटले. या परिसंवादात शेतीचे मांडलेले ठराव आणि झालेले मंथन जगासमोर मांडायचे असल्याचा ठराव या परिसंवादातून मांडण्यात आला असून, दूरगामी परिणाम निघावेत यासाठीचे हे प्रयत्न असल्याचे जेफ्रीस म्हणाले.

Web Title: Farm should get prices based on the cost of production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.