अकोला व वाशिम जिल्ह्यातील २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३२०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:45 PM2018-08-06T12:45:21+5:302018-08-06T12:47:46+5:30
अकोला व वाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.
- संतोष येलकर
अकोला : कर्जमाफी योजनेच्या विस्तारात सन २००९ पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सन २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय गतवर्षी जूनमध्ये शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर कर्जमाफी योजनेच्या विस्तारात सन २००८ मध्ये केंद्र शासनाच्या कर्जमाफी योजनेत आणि सन २००९ मध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्र्जमाफी योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांंना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ९ मे २०१८ रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार सन २००९ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकºयांपैकी १ आॅगस्टपर्यंत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या संबंधित शेतकºयांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. याद्यांची तपासणी करून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सन २००८ व २००९ च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकºयांना कर्जमाफी मिळाला नाही, अशा सन २००१ ते २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या ३ हजार २०० शेतकºयांच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-गोपाळ मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)