आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:19 AM2020-06-29T10:19:07+5:302020-06-29T10:19:16+5:30
मृतकाचे नाव अशोक राघोजी उपर्वट (५८) रा. देऊळगाव असे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील गावालगतच्या शेतशिवारात गळफास घेऊन एका शेतकºयाने जीवन संपविल्याची घटना घडली आहे. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारातील झाडाला शेतकºयाने गळफास घेतल्याचे गावकऱ्यांच्या दिसले. मृतकाचे नाव अशोक राघोजी उपर्वट (५८) रा. देऊळगाव असे आहे.
मृतक अशोक उपर्वट यांनी गतवर्षी १० हजार रुपयांचे खासगी कर्ज घेतले होते. कर्जाचे व्याज वाढतच गेल्याने त्यांच्यासमोर कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच नव्याने पेरणी केलेल्या जमिनीत बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर आले होते.
अगोदरच कर्जाचा डोंगर व त्यातच दुबार पेरणीचे संकट यामुळे अशोक उपर्वट यांनी मृत्यूला कवटाळले.
पातूर तालुक्यात याअगोदर देखील कर्जाचे हप्ते न फेडू शकल्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतकाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून, शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या प्रकरणात पातूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. बायसठाकूर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)