सांगवी येथे शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:11+5:302021-05-29T04:16:11+5:30

वल्लभनगर : येथून जवळच असलेल्या सांगवी खुर्द येथील ज्ञानदेव मोरे यांनी शुक्रवार, दि. २८ मे रोजी शेतात निंबाच्या झाडाला ...

Farmer commits suicide at Sangvi | सांगवी येथे शेतमजुराची आत्महत्या

सांगवी येथे शेतमजुराची आत्महत्या

Next

वल्लभनगर : येथून जवळच असलेल्या सांगवी खुर्द येथील ज्ञानदेव मोरे यांनी शुक्रवार, दि. २८ मे रोजी शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, नातू असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

-----------------------

वाडेगाव-बाळापूर रस्त्यावर अपघात

वाडेगाव : वाडेगाव-बाळापूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालक बटवाडी येथील रहिवासी असून, स्वतःची गाडी दुरुस्त करून परत जात असताना मागच्या बाजूने वाहनाला धडक दिली आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.

----------------------------

नागरिक बेफिकीर, धोका वाढला!

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र आहे. वाडेगाव येथील बाजारात गर्दी होत असून, नागरिक विनामास्क वावर करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Farmer commits suicide at Sangvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.